कळंब येथे तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा
युवा संघर्ष न्यूज / मुख्य संपादक
कळंब येथील स्व. भाऊसाहेब भोरे शैक्षणिक संकुल येथे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा व शेतकरी अनुभव कथन मेळावा उत्साहात पार पडला. सदर उपक्रम विज्ञान संत अंकुश पाटील (सांगली) यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसेवक संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष विजय देशमुख, उद्घाटक शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर
लिंगनवार, प्रमुख मार्गदर्शक विज्ञान संत अंकुश पाटील, प्रमुख अतिथी सुदाम पवार, शिवसेना अभिषेक पांडे, राजेंद्र देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक शिवशक्ती शिक्षण संस्थेचे
व्यवस्थापक प्रा. बाळासाहेब धांदे यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यशाळेत शेतकऱ्यांना घरच्या घरी स्वस्तात खते तयार करण्याचे, वॉटर सॉल्युबल तसेच संजीविके, कीटकनाशके व बुरशीनाशके तयार
करण्याच्या पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल, यावर विशेष भर देत शेतकऱ्यांना आधुनिक आणि शाश्वत शेती पद्धतींचे मार्गदर्शन करण्यात आले.
कोठा व सावरगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. रविशंकर धांदे, शिवशक्ती शिक्षण संस्था कोठा (वेणी) तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
युवा संघर्ष न्यूज
मुख्य संपादक सुशील हटवार 9359412352

Post a Comment
0 Comments