Type Here to Get Search Results !

मोबाइल चोरून 'फोन पे'मधून पैसे ट्रान्सफर

 मोबाइल चोरून 'फोन पे'मधून पैसे ट्रान्सफर

कळंब पोलिसांत गुन्हा दाखल

यवतमाळ कळंब

कळंब : बसमध्ये प्रवाशाचा

मोबाइल चोरून फोन पे मधून पैसे नागपूर येथे ट्रान्सफर केल्याचा प्रकार वर्धा बसमध्ये घडला. याबाबतची तक्रार कंळब पोलिसांत करण्यात आली.


येथील बसस्थानकावरून बसने ९ एप्रिलला नागपूर येथे जाण्यासाठी शंकर मांढरे रा. पिंपळगाव हे बसमध्ये प्रवासासाठी निघाले होते. बस वर्धा येथे पाहोचली. यावेळी त्यांनी मोबाइल लावण्यासाठी खिशात हात घालून पाहिले तर मोबाइल चोरी गेल्याचे निदर्शनास आले. ते नागपूर येथे पोहचल्यानंतर घडलेल्या प्रकाराची माहिती


मुलाला सांगितली. त्या मोबाइलचे फोन-पे मध्ये पैसे असल्याने ते काढणार तर नाही अशी त्यांना भिती वाटत असल्याने मोबाइल बंद येत होता. नागपूर येथे असल्याने परत गावी जावून मोबाइल सीम नंबर बंद करू असे ठरवून ते चार दिवसांनी परत आले. याबाबतची तक्रार त्यांनी कळंब पोलीस स्टेशनला दिली. तसेच बँकमध्ये जावून त्यांच्या खातेतून फोन-पे ने दोनदा रक्कम काढल्याचे दिसून आले. त्यात २६ हजार रुपये व सहा हजार ५०० रुपये असे ३२ हजार ५०० रुपये अज्ञात चोरट्यांनी काढल्याचे समोर आले. सदर ट्रान्झेशन कुठल्या खात्यावर झाले याचा तपास पोलीस करीत आहे.  


युवा संघर्ष न्यूज 

         मुख्य संपादक 

                  सुशील हटवार 

Post a Comment

0 Comments