Type Here to Get Search Results !

कळंब तालुक्यातील कोठा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन; विविध शासकीय सेवा एकाच छताखाली मिळाली

 कळंब तालुक्यातील कोठा  येथे ‘छत्रपती शिवाजी  महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन; विविध शासकीय सेवा एकाच छताखाली  मिळाली


कळंब (यवतमाळ):

नागरिकांच्या शासकीय कामांमधील अडचणी दूर करून त्यांना विविध दाखले आणि महसूल सेवा थेट उपलब्ध करून देण्यासाठी तहसील कार्यालय, कळंब यांच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर (टप्पा-१)’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी शिवशक्ती कनिष्ठ विद्यालय, कोठा येथे संपन्न झाला.


यवतमाळचे जिल्हाधिकारी मा. श्री. विकास मीना,  कळंबचे तहसीलदार मा. श्री. धिरज स्थुल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर राबविण्यात आले होते.


शिबिरात मिळणाऱ्या प्रमुख सेवा:

या शिबिरामध्ये एकाच ठिकाणी नागरिकांना खालील महत्त्वाच्या सेवांचा लाभ घेता येईल:

महसूल सेवा: ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उतारा वाटप, प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे.

प्रमाणपत्रे: उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रांचे वाटप.

योजनांचा लाभ: सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, अकृषिक (NA) तरतुदींबाबत मार्गदर्शन, नवीन व्यवस्थापनानुसार 'सनद' प्रक्रियेची माहिती.

शेतकरी व ग्रामीण विकास: ॲग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी,AI महाविस्तार, फार्मर कप पाणी फाउंडेशन व  गटशेती माहिती , NCMC CARD,भू-संपादन प्रकरणे, घरांसाठी पट्टे वाटप आणि ई-मोजणी अर्ज प्रक्रिया.

विद्यार्थी सहाय्य: शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दाखल्यांचे वाटप.व तसेच प्रमाणपत्र सुध्दा वाटप करण्यात आले.

याव्यतिरिक्त नगर परिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग व इतर शासकीय विभागांच्या सेवाही या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आल्या.


कोठा परिसरातील तसेच कळंब तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. आपल्या प्रलंबित कामांच्या निपटारा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह शिबिर स्थळी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी व तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.


युवा संघर्ष न्यूज 

मुख्य संपादक :- सुशील हटवार

Post a Comment

0 Comments