कळंबला श्रीराम नवमी जन्मोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरी
युवा संघर्ष न्यूज संपादक :- सुशील हटवार
रामनवमीच्या पावन निमित्ताने कळंब नगरीत श्रीरामाच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. जय श्रीराम च्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या शोभायात्रेत आकर्षक फुलांनी सजवलेला श्रीरामांचा रथ, विविध वेशभूषेत साकारलेले रामायणातील पात्र, ढोल-ताशांच्या गजरात निघालेली मिरवणूक हे प्रमुख आकर्षण ठरले. शहरातील शिवाजी चौकातून शोभायात्रेला सुरुवात झाली प्रमुख मार्गांवरून ही शोभायात्रा मोठ्या जल्लोषात पार पडली. शेकडो रामभक्तांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला.
महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी मोठ्या श्रद्धेने, उत्साहाने सहभाग नोंदवला. ठिकठिकाणी फुलांची उधळण करून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व प्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील इंदिरा चौक, राम मंदिर रोड परिसरात विशेष सजावट केली होती. आकर्षक रोषणाई व स्वागत कमानींमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. या निमित्ताने कळंब नगरीत भक्ती, परंपरा आणि एकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. नागरिकांनी या भव्य शोभायात्रेचे मनापासून कौतुक केले असून भविष्यातही अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments