Type Here to Get Search Results !

*यवतमाळ येथे भव्य भाषणकला कार्यशाळा*


 *यवतमाळ येथे भव्य भाषणकला कार्यशाळा*



यवतमाळ (दि.16)    

  

       व्यक्तिमत्त्व विकास, प्रभावी संवादकौशल्य आणि आत्मविश्वासपूर्ण वक्तृत्व यांसाठी प्रसिद्ध असलेल्या आनंदी गुरुकुल भाषणकला अकॅडमी, अकोला आणि प्रसिद्ध निवेदिका मृणालिनी दहीकर यांच्या वतीने यवतमाळ येथे भव्य एकदिवसीय भाषणकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आली असून अत्यंत माफक शुल्क ठेवण्यात आले आहे.


          कार्यशाळेमध्ये स्टेजवरील भीती दूर करणे, प्रभावी भाषणाची रचना, आत्मविश्वास वाढविणे, संवादकौशल्य विकसित करणे, सूत्रसंचालन व निवेदनाची मूलतत्त्वे, मुलाखत, स्पर्धा परीक्षा, सार्वजनिक जीवन तसेच व्यावसायिक क्षेत्रात प्रभावीपणे व्यक्त होण्याची कला आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. सहभागींसाठी प्रत्यक्ष स्टेज सरावाची विशेष संधी उपलब्ध राहणार असून १०० टक्के स्टेज डेअरिंग आणि प्रभावी बोलण्याची हमी हे या कार्यशाळेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.


       कार्यशाळेच्या प्रमुख प्रशिक्षक म्हणून प्रा. डॉ. दीपाली आतिश सोसे मार्गदर्शन करणार आहेत. त्या सात विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत संपादन केलेल्या अभ्यासू वक्त्या आहेत.भाषणकला, संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास या क्षेत्रात त्यांना दीर्घ अनुभव आहे. विशेष म्हणजे आजवर महापौर, नगरसेविका, प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती तसेच शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून भाषणकलेचे प्रशिक्षण घेतले आहे.


          प्रा. डॉ. दीपाली सोसे या ६६ प्रकाशित पुस्तकांच्या लेखिका असून त्यांना देशभरातील ७६ राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाणलोट विभागाच्या माजी जिल्हा प्रशिक्षण समन्वयक, 'नाट्यशास्त्र' विषयात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या, प्रख्यात लेखिका, शिक्षणतज्ज्ञ, मराठी भाषा अभ्यासक आणि 'अभिनय गुरु' म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी लिहिलेल्या 'अभिजात मराठी' आणि 'माय मराठी' या क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या मालिकांचा सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्रभर अभ्यासक्रमात समावेश आहे. आजवर भारतातील विविध राज्यांमध्ये त्यांची शेकडो व्याख्याने झाली आहेत.


       कार्यशाळेचे सहप्रशिक्षक प्रा. आतिश सुरेश सोसे हे ११५ प्रकाशित पुस्तकांचे लेखक, समुपदेशक, सूत्रसंचालक, शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासू वक्ते म्हणून परिचित आहेत. त्यांच्या 'महाराष्ट्र कन्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील' या चरित्रग्रंथाचे इंग्रजी, जर्मनसह २४ भारतीय भाषा आणि ९ लिपींमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळात माजी सहसंपादक म्हणून कार्य केले आहे. प्रभावी संवाद, मंच संचालन, व्यक्तिमत्त्व विकास आणि सादरीकरण कौशल्य यांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे.


      ही कार्यशाळा विद्यार्थी, शिक्षक, पालक, गृहिणी, व्यावसायिक, अधिकारी, कर्मचारी, कलाकार, शेतकरी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींसह सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुषांसाठी खुली आहे.


         या कार्यशाळेच्या प्रमुख आयोजक तथा निवेदिका मृणालिनी दहीकर  अत्यंत निष्ठेने निवेदन क्षेत्रात कार्यरत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, महिला आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांना दर्जेदार भाषणकला प्रशिक्षणाचा लाभ मिळावा या उद्देशाने त्यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.


        प्रवेश संख्या मर्यादित असून इच्छुकांनी त्वरित नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.अधिक माहितीसाठी व प्रवेश नोंदणीसाठी : मृणालिनी दहीकर (निवेदिका), यवतमाळप्रमुख आयोजक,

📞 90673 91525 या क्रमांकावर संपर्क करावा.

जनसामान्यांचा आवाज युवा संघर्ष न्यूज

 मुख्य संपादक सुशील हटवार 

Post a Comment

0 Comments