Type Here to Get Search Results !

*शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळेचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार कु. क्लुप्ती प्रवीण चंदनशिवे हिला जाहीर*

 *शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळेचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार कु. क्लुप्ती प्रवीण चंदनशिवे हिला जाहीर*


युवा संघर्ष न्यूज 

कळंब : शहर प्रतिनिधि :- नितेश शिरसागर 

स्थानिक शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळा, कळंब येथे शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे कु. क्लुप्ती प्रवीण चंदनशिवे हिची शाळेच्या आदर्श विद्यार्थी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

शैक्षणिक प्रगती, शारीरिक क्षमता, शाळेतील विविध उपक्रमांमधील सक्रिय सहभाग तसेच उत्कृष्ट वागणूक आणि आदर्श व्यक्तिमत्त्व या सर्व निकषांवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तिला हा सन्मान प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार स्व.विमलबाई बन्सीलाल मुनोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विनय बन्सीलाल मुनोत यांच्या तर्फे दिला जात असून, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


कु. क्लुप्ती चंदनशिवे हिने आपल्या मेहनत, शिस्त आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेच्या जोरावर हा मानाचा पुरस्कार प्राप्त केल्याने तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

याप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक प्रा. रविशंकर उर्फ बाळासाहेब धांदे यांनी क्लुप्तीचे मनःपूर्वक अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी तिच्या यशाला इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श असे संबोधले.

शाळेचे मुख्याध्यापक यांनीही आपल्या मनोगतात, “क्लुप्ती चंदनशिवे हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर विद्यार्थ्यांनीही शैक्षणिक, सामाजिक आणि नैतिक मूल्यांमध्ये उत्कृष्टता साधण्याचा प्रयत्न करावा,” अशा भावना व्यक्त केल्या.


तसेच शाळेतील शिक्षक प्रवीण देशमुख, मनोज शिवरकर, शिवम चांदोरे, मयूर होले, कु. चंद्रभागा मेश्राम, कु. शालू सदाफळे आणि सौ. प्रांजली दरणे यांनीही क्लुप्तीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे मनापासून अभिनंदन करण्यात आले 

युवा संघर्ष न्यूज 

 मुख्य संपादक :- सुशील हटवार 

Post a Comment

0 Comments