श्राद्ध आणि भक्तीनेच जीवनाचे कल्याण; आर्णीतील शिवमहापुराण कथेचा सातव्या दिवशी महाप्रसादाने समारोप
संपादक :- सुशील हटवार ,यवतमाळ
आर्णी: "मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याने आपल्या कर्मासोबतच भक्तीचा मार्ग धरला, तर त्याचे जीवन सार्थकी लागते. भगवान शंकराची भक्ती ही केवळ सोपस्कार नसून ती अंतर्मनाची ओढ आहे," असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कथावाचक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंडित प्रदीपजी मिश्रा (सीहोर वाले) यांनी केले.
आर्णी येथे आयोजित भव्य शिवमहापुराण कथेच्या आजच्या सातव्या व अंतिम दिवशी भाविकांचा जनसागर उसळला होता. 'शिव-कल्याण' या विषयावर मार्गदर्शन करताना पंडित मिश्रा यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
आजच्या कथेमध्ये पंडितजींनी शिव विवाहाचे महत्त्व आणि संसारातील शिवतत्वाचा वापर कसा करावा, यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, संकटाच्या वेळी घाबरून न जाता 'एक लोटा जल' श्रद्धेने अर्पण केल्यास महादेवाची कृपा नक्कीच प्राप्त होते. कथेदरम्यान त्यांनी विविध पौराणिक दाखले देत उपस्थित भाविकांना साध्या आणि सोप्या भाषेत जीवनाचे सार समजावून सांगितले.
भाविकांची विक्रमी उपस्थिती:
आर्णी तालुक्यासह संपूर्ण यवतमाळ जिल्हा आणि विदर्भातील विविध भागांतून लाखो भाविकांनी कथेचा लाभ घेतला. कथेच्या समारोप प्रसंगी संपूर्ण परिसर 'ओम नमः शिवाय' च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
महाप्रसाद आणि व्यवस्था:
कथेच्या सातव्या दिवशी आयोजकांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कथेच्या यशस्वीतेसाठी आर्णी येथील स्थानिक सेवाभावी संस्था, पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांनी चोख बंदोबस्त व व्यवस्था ठेवली होती. महाआरतीने कथेची सांगता करण्यात आली.
आपला नम्र,
युवा संघर्ष न्यूज संपादक :- सुशील हटवार
9359412352

Post a Comment
0 Comments